जगणे खेळत राहूया – दाव जीवनना खेलता रहीए

गझल या विषयात जी थोडी फार गती आहे त्या मुळे अनेक उत्तम गझलकारांची भेट झाली. त्या पैकीचं एक महत्वाचं नाव म्हणजे Chittaranjan Bhat. उत्तम गझल लिहितात. असंच लिहित रहा. आम्हाला आनंद देत रहा आणि मराठी गझलेला समृद्ध करत रहा. वाढदिवसाच्या (belated) अनेक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला तुमच्याच एका सुंदर गझलेच्या काही शेरांचा गुजराती अनुवाद अर्पण!

कैफी आज़मी, जावेद अख़्तर, साहिर लुधयानवी आणि गुलज़ार यांच्या उर्दू कवितांचा वृत्तबद्ध गुजराती अनुवाद करणारे माझे मार्गदर्शक Dr. Raeesh Maniar यांचा १९ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. मी त्यांना विचारलं की तुम्हाला गुरूदक्षिणा म्हणून काय पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की मराठी गझलांचा गुजराती अनुवाद कर. हा अनुवाद त्यांनाही अर्पण! રઈશભાઈ, ચિત્તરંજન ભટની આ ગઝલનો અનુવાદ આપને અર્પણ!

जगणे खेळत राहूया________ दाव जीवनना खेलता रहीए
उधळत मांडत राहूया_______मांडता ने बगाडता रहीए

सरकत जाते वाळू पण______भले रेती सरकती जाय छे आ
रेघा ओढत राहूया__________आपणे लीटा पाडता रहीए

मुद्दा टाळत राहूया_________मुद्दो ए रीते टाळता रहीए
मुद्दे बदलत राहूया_________ मुद्दा बीजा ज काढता रहीए

ऐकूही यायला नको_________कंई ज संभळाय नहि कोईने पण
सर्व बोंबलत राहूया_________आपणे सौ बराडता रहीए

पुरते गदळायला हवे________पुरतुं डहोळावुं जोईए ए हवे
पाणी ढवळत राहूया________चाल पाणी वलोवता रहीए

कधीतरी होईल खरे________शक्य छे ए कदी थशे साचुं
खोटे बोलत राहूया_________आपणे खोटुं बोलता रहीए

खोटे बोलू द्या त्यांना________एमने खोटुं बोलवा दो ने!
खरेच बोलत राहूया________आपणे साचुं बोलता रहीए

– चित्तरंजन भट__________ – गुजराती अनुवाद – हेमंत पुणेकर

This entry was posted in અનુવાદ, ગઝલ. Bookmark the permalink.

Leave a comment